शिक्षणाधिकारी यांच्या भेटीने वनभोजनाचा आनंद द्विगुणीत

2

वैभववाडी प्रतिवर्षी प्रमाणे मुलांना चार भिंतीच्या आतील अध्ययन-अनुभव सोबत प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन अनुभव घेता यावेत, मुक्तपणे व्यक्त होता यावे, निसर्गाशी नातं अधिक घट्ट व्हावे या हेतूने एडगांव व वायंबोशी या गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांचे शिक्षणप्रेमी पालक व अधिकारी वर्ग यांच्या समवेत वनभोजन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी भेट घेत मुलांशी संवाद साधला व त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला. तसेच त्यांनी मुलांसोबत भेळीचा आस्वाद घेतला व सर्जनशील प्रश्नाद्वारे मुक्त चर्चा केली. त्यामुळे मुले व अधिकारी यांच्यातील अंतर काही अवधीतच कमी झाले. यावेळी सोबत विस्तार अधिकारी मुकुंद शिणगारे, निसार नदाफ, केंद्रप्रमुख विजय केळकर, संतोष गोसावी, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
सदर वनभोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा समित्यांचे अध्यक्ष, पालक, बळीराम रावराणे, रणजित पाताडे, नाना तांबे, चेतन बोडेकर, राजेश कळसुलकर, अलका खाडे, सारिका सासणे, स्मृती पवार ,गोविंदा रावराणे स्वयंपाकी वनिता पवार यांनी योगदान दिले.

5

4