गोव्यात पाचव्या भारतीय सायन्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन…

2

पणजी ता.१०: विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल प्रेम निर्माण व्हावे आणि चित्रपटांच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार व्हावा, या उद्देशाने गोव्यात पाचव्या भारतीय सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या १५ ते  १८ जानेवारी सकाळी १०  ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयनॉक्स कॉम्प्लेक्स आणि मॅकेनिझ पॅलेस येथे विज्ञान परिषद, गोवा यांच्यामार्फत आयोजित होणार आहे. यामध्ये २५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी १५ रोजी सकाळी १० वाजता सायन्स फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे.

4