माजगाव येथील दुचाकी अपघातात महाविदयालयीन विद्यार्थी जखमी…

2

सावंतवाडी ता.१०: दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात माजगाव येथील महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाला.किरण कल्लापा परीट-पाटील (वय.२०) रा.माजगाव,असे त्या युवकाचे नाव आहे.ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील पंचम नगर समोर सावंतवाडी-शिरोडा मार्गावर घडली.दरम्यान त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.याबाबतची माहिती मिळताच येथील महेंद्र क्लासेसचे संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यानी जखमीला सहकार्य केले.मात्र याबाबत कोणतीही नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात नाही,असे ठाणे अमंलदार भागवत यांनी सांगितले.

4