२४, २५ जानेवारीला महिलांसाठी ग्रुप डान्स, सौभाग्यवती स्पर्धा…

226
2
Google search engine
Google search engine

 

रणरागिणी महिला सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन…

मालवण, ता. ११ : रणरागिणी महिला सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ग्रुप डान्स आणि रणरागिणी सौभाग्यवती स्पर्धा २४ ते २५ जानेवारी या कालावधीत पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.
यात २४ रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत ग्रुप डान्स स्पर्धा होईल. २५ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजता रणरागिणी सौभाग्यवती स्पर्धा होईल. दुपारी ४ ते ५.३० वाजता १७ ते २४ वयोगटातील मुलींसाठी सुंदरी स्पर्धा होईल. सायंकाळी ५.३० ते ७ यावेळेत विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय अन्य आकर्षक परितोषिकेही दिली जाणार आहेत. तरी इच्छुक महिला स्पर्धकांनी आपली नावे नीलम शिंदे- ९३५९१४८४९०, विद्या फर्नांडीस ७७६७०५३३६४ यांच्याकडे लवकरात लवकर नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.