आपल्या वाहन चालवण्याचा दुसऱ्याला फटका नको…!

2

प्रसाद दळवी; सावंतवाडी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बाईक रॅली…

सावंतवाडी ता.११: वाहनधारकांनी गाडी चालवताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे.आपल्या वाहन चालविण्यामुळे स्वतः समोरच्या वाहनधारकांना त्याचा फटका बसून याची खबरदारी घ्यावी,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी आज येथे केले.उपप्रादेशिक परिवहन विभाग,सिंधुदुर्ग व वाहतूक पोलीस शाखा,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.यानिमित्त येथील जगन्नाथराव भोसले उद्याना कडून शहरात विद्यार्थींनींच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचे उद्घाटन श्री.दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सागर भोसले, जावेद शिकलकर, विजयकुमार अलमवार, जितेंद्र पाटील, वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश भोसले, संजय केळकर, सिकंदर गवळी,शिवाजी राठोड, प्रकाश गावडे,पोलीस हवालदार विष्णू सावळ, विलास नर, महेंद्र बांदेकर, प्रशांत धुमाळे, सखाराम भोई,दीपक दळवी, समीर वारंग,श्याम भगत,अमित पालकर, संतोष दाभोळकर यांच्यासह येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे विद्यार्थी व शिक्षक मालविका गावडे,सेजल दळवी, योजना पाटकर, निकीता गवस,प्राची देसाई, प्रचिती पार्सेकर,सुधाराणी नागनूर,
विश्वा सावंत, श्रूती वाळके,
मयुरी जाधव, हवाबी शेख,
श्रुती हेवाळेकर,कविता सामंत, नंदिता यादव आदी उपस्थित होते.

4