नवनिर्वाचित पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या मालवणात सत्कार…

2

मालवण, ता. ११ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे. याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्यावतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्या सायंकाळी ५.३० वाजता मालवण शिवसेना कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास खासदार विनायक राऊत, आम. दीपक केसरकर, आम. वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण मधील पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या हस्ते उदय सामंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी केले आहे.

4