तालुक्यातील विविध प्रश्नांवर झाली सकारात्मक चर्चा…
वेंगुर्ले : ता.११ वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सिद्धेश उर्फ भाई परब यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली असता लवकरच सर्व काम पूर्ण होतील असे आश्वासनं श्री.मुश्रीफ यांनी दिले आहे.
तालुक्यात रेडी येथील टाटा मेतलिक्स कंपनी बंद पडल्या नंतर बरेच तरुण बेरोजगार झाले आहेत. यासाठी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी एखादेि कंपनी सुरू झाली तर त्याचा फायदा अनेक कुटुंबांना होईल यासाठी श्री. परब यांनी मंत्रीमहोदय यांचे लक्ष वेधले तसेच शिरोडा येथील गांधी स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे आणि जिल्ह्यात चांदा ते बांदा योजना सुरळीत सुरू करून ज्यांनी प्रस्ताव केले आहेत त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. या विषयावरही चर्चा झाली तसेच जिल्ह्यातील अन्य समस्यांवर लक्ष वेधण्यास त्यांना विनंती करण्यात आली.