सावंतवाडीत कॅथॉलिक समाजाचा २ फेब्रुवारीला वधू-वर मेळावा…

2

सावंतवाडी ता.११:  येथील कॅथॉलिक असोसिएशन आणि कॅथॉलिक अर्बन को-ऑप.क्रेडिट.सोसा.लिमिटेड यांच्या माध्यमातून नववर्षाच्या मुहूर्तावर २ फेब्रुवारी रोजी ख्रिस्ती बांधवांचा भव्य वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा येथील नवसरणी केंद्रात होणार आहे.या मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या जोडप्यांना आपला मनपसंत साथीदार निवडण्याची संधी देण्यात येणार आहे.यावेळी जास्तीत-जास्त इच्छुक वधू-वरांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

4