पाणलोट समिती सचिवांची तातडीची सभा उद्या…

2

बांदा,ता.११:
सावंतवाडी तालुका पाणलोट समिती सचिव संघटनेची तातडीची सभा सावंतवाडी दैवज्ञ गणपती मंदिरानजीकच्या उद्यानात सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. सभेत सचिवांचे दोन वर्षांचे थकीत मानधन, प्रवास भत्ता व कार्यालयीन खर्च यावर चर्चा होणार आहे. तालुक्यातील सर्व समिती सचिवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश आडेलकर यांनी केले आहे.

4