वेंगुर्ला : ता.११ वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी सदिच्छा भेट देऊन येथील प्राध्यापकांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना बदलत्या जगामध्ये चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. अपुऱ्या सुविधा व येणाऱ्या अडचणीवर मात करुन शिक्षणाचा उत्कृष्ट दर्जा राखण्याचा व वाढविण्याचे योगदान प्राध्यापक करतात. विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात विविध उपक्रमाद्वारे प्रशिक्षण देणे, तंत्रज्ञानाचा वापर व करिअर निवडीसाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा व भौगोलिक गरजा जाणून, नविन व्यवसायाची चाहूल विद्यार्थ्यांना देऊन त्यानुसार कौशल्य विकसित अभ्यासक्रम तयार करणे, त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे डॉ.पेडणेकर यांनी सांगितले.
यावेळी मुंबई विद्यापिठाचे डॉ.आर. डी. कुलकर्णी, डॉ.राजेश खरात, डॉ.अनुराधा मुजुमदार, डॉ.अजय भामरे, डॉ.विनायक दळवी, डॉ.सुधीर पुराणिक, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.प्रदिप होडावडेकर यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते.