संजू परब; सावंतवाडीत रोजगार मेळाव्याचे उद्घाटन…
सावंतवाडी ता.१२: आजच्या रोजगार मेळाव्याची गर्दी पाहून जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या किती आहे,याची प्रचिती येते.राजकारणी लोकांच्या कटू कारस्थांनामुळे या ठिकाणी आलेले अनेक प्रकल्प परतून गेले आहेत.त्यामुळे याचा फटका येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना बसला आहे,असे प्रतिपादन नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केले.येथील नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन श्री.परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,मुख्याधिकारी संतोष जिरगे,सभापती मानसी धुरी,माजी सभापती पंकज पेडणेकर,राजू बेग,दिपाली भालेकर,आनंद,नेवगी,भारती मोरे,शुभांगी सुकी,समृद्धी विरनोडकर,उत्कर्षा सासोलकर,बांदा सरपंच अक्रम खान आदी उपस्थित होते.