माजगाव-नाला येथे तीन आसनी रिक्षेला अपघात…

2

चालकासह पाच जण जखमी; रिक्षेचा चक्काचूर…

सावंतवाडी/भक्ती पावसकर ता.१२:
रिक्षाचा ब्रेक फेल झाल्यामुळे रिक्षा ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात चालक गजा कुडपकर रा.सालईवाडा यांच्यासह पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माजगाव नाला परिसरात घडली.अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात कोणती माहिती नाही.तर जखमींना शिवसेनेचे कार्यकर्ते शब्बीर मणियार व विश्वास घाग यांनी तात्काळ रुग्णालयात हलवले.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.कुडपकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन सावंतवाडीच्या दिशेने येत होते.यावेळी माजगाव नाला परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकच्या बाजूला आल्यानंतर त्यांच्या गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले व ट्रकच्या मागील बाजूस रिक्षा आदळली.यात गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.दरम्यान अपघाताची माहिती मिळतात त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या श्री.मणियार व श्री.घाग यांनी तेथील जमलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने कुडपकर व अन्य जखमी प्रवाशांना येथील रुग्णालयात दाखल केले.

3

4