ना. उदय सामंत; विरोधकांना नाव न घेता लगावला टोला…
वैभववाडी/पंकज मोरे.ता,१२:
भविष्यात सिंधुदुर्ग गोव्यासारखा नाही तर त्याहून सुंदर पर्यटन जिल्हा म्हणून बनविला जाईल. असा विश्वास व्यक्त करीत जिल्ह्यातील जनता विकासासाठी भूकेलेली आहे. तुमचा पालकमंत्री म्हणून कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. बसलेले सर्व वाघ आहेत. कोणीही अंगावर येवू नये. असा टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला.
जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री उदय सामंत यांचे येथील संभाजी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, मंगेश लोके
लक्ष्मण रावराणे, अशोक रावराणे, दिगंबर पाटील, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, गुलाबराव चव्हाण, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, प्रदीप रावराणे, स्वप्नील धुरी, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, महिला तालुका आघाडी प्रमुख अर्चना कोरगावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले, वैभववाडीवासियांनी केलेला सत्कार मी वाया जावू देणार नाही. सर्वांच्या लक्षात राहील असा वैभववाडीचा विकास येत्या पाच वर्षात करीन. पुढील पाच वर्षाचा कणकवली, वैभववाडी व देवगड या मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा आमदार असेल. मी मंत्री म्हणजे महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता कॕबीनेट मंत्री आहे.
येत्या पाच वर्षात वैभववाडीला भरभरून देऊ. असा विश्वास व्यक्त करीत भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याच्या दुपटीने पर्यटन जिल्हा म्हणून बनविला जाईल. जिल्ह्यातील जनता विकास कामांना भूकेलेली आहे. प्रशासनाचे काम करताना आपल्याला विश्वासात घेऊनच काम करीन. शिवाय सर्व पदाधिका-यांना अधिकाऱ्यांकडून कसा मान देता येईल. याची दक्षता घेउन. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझ्या खांद्यावर पालाकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यांना अपेक्षित असलेले काम झाले पाहिजे. असे सांगत आज प्रत्येक शिवसैनिक कॕबिनेट झाला असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
पुढे बोलाताना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ना. उदय सामंत यांनी कॕबिनेट मंत्री पदाची शपथ आमचा आनंद व्दिगुणीत झाला. तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हासाठी मोठा निधी आणला. त्यांच्या दुपटीने आपण निधी आणाल. असा विश्वास व्यक्त केला.
आजपर्यंत जिल्ह्याला जेवढे पालकमंत्री लाभले ते तालुक्यात फार कमी आले. अशी खंत व्यक्त करीत मला कोकणात ना. सामंत यांनी संधी दिली. सिंधुदुर्गावर त्यांचे पहिल्यापासून प्रेम आहे. रत्नागिरीत तुम्ही विकासाची गंगा आणलात. तिच विकासाची गंगा सिंधुदुर्गात आणा. तसेच जिल्ह्यातील विकास व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी न्याय मिळवून द्याल. आपल्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा व जिल्ह्यात ‘धनुष्यबाण’ मानाने उंचवाल. असा विश्वास अतुल रावराणे यांनी व्यक्त केला.