अज्ञात वाहनाच्या धडकेत आंबोली सैनिक स्कूलचे कर्मचारी जखमी…

286
2
Google search engine
Google search engine

आंबोली घाटात घडला अपघात; अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी हलविले…

आंबोली ता.१२: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून अंबोली सैनिक स्कूल मधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.दिनेश विठ्ठल गावडे (३१) रा.आंबोली-कामतवाडी,असे त्यांचे नाव आहे.हा अपघात आज सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात घडला.अपघातानंतर जखमीला येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल नार्वेकर व मायकल डिसोजा यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.दरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.गावडे हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने येत होते.दरम्यान आंबोली घाटातील एका मोठ्या वळणावर कर्नाटक पासिंग असलेल्या चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात ते गंभीर जखमी झाले.दरम्यान तेथून जाणाऱ्या श्री.नार्वेकर व डिसोजा यांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.