सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या वतीने नगराध्यक्ष संजू परबांचे अभिनंदन…

2

सावंतवाडी ता.१२: येथील मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचे आज पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री.परब यांनी सांगितले.
नगराध्यक्ष संजू परब यांची रविवारी सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष रफिक मेमन, बाबू करोल, सचिव शफी खान, जाम करोल, इम्तियाज विराणी, हारुफ मेमन, सलिम मेमन, शब्बीर शेख, अल्ताफ मुल्ला, महंमद समेजा, नदीम शहा, बांदा सरपंच अक्रम खान आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष रफिक मेमन यांच्या हस्ते परब याना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

4