Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुंबई-गोवा महामार्गावर पत्रकार, नागरीकांना टोल माफी मिळावी...

मुंबई-गोवा महामार्गावर पत्रकार, नागरीकांना टोल माफी मिळावी…

कणकवली तालुका पत्रकार संघाची पालकमंत्री ना़ उदय सामंत यांच्याकडे मागणी; पालकमंत्र्यांचा सत्कार…

कणकवली, ता.१२ : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना़ उदय सामंत यांचा सत्कार अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले़ त्यानंतर पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीक व पत्रकारांना महामार्गावरील टोल आकारणीतून वगळून टोल माफी देण्यात यावी़ अधिस्विकृतीच्या अटी शिथिल करून सर्व पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा़ कणकवलीत गृहनिर्माणसाठी मोफत भुखंड देण्यात यावा या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आल्या़
यावेळी अध्यक्ष भगवान लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधिर राणे, माजी अध्यक्ष अजित सावंत, लक्ष्मीकांत भावे, चंद्रशेखर तांबट, महेश सावंत, महेश सरनाईक, दिगंबर वालावलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप हिंदळेकर, तुषार सावंत, राजन चव्हाण,तुळशिदास कुडतरकर, भास्कर रासम, शशिकांत सातवसे, पप्पू निमणकर, अनिकेत उचले, विकास गांवकर, नाना लाड, साईनाथ गांवकर आदींसह कणकवली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते़
पालकमंत्री ना़ उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात कणकवली तालुका पत्रकार संघाचे सुमारे ९८ सभासद आहेत़ विविध वृत्तपत्र व वाहिण्यांमध्ये हे सर्व पत्रकार काम करत आहेत़ बरेच पत्रकार ग्रामीण भागामधून कणकवली शहरात येऊन काम करत असल्याने निवासासाची गैरसोय आहे़ गेल्या चार ते पाच वर्षांपासून या गृहनिर्माण प्रकल्पाकरीता आमचा शासनाकडे पाठपुरावा आहे़ अद्यापही आम्हाला भुखंड उपलब्ध झालेला नाही़ कणकवली शहरात किंवा शहरालगत असलेल्या आरक्षणातील शासकीय भुखंड मोफत उपलब्ध करून द्यावा़ त्या भुखंडावर गृहनिर्माण प्रकल्प उभा करण्यासाठी मदत होणार आहे़
कणकवली तालुक्यात काम करणाºया सर्व पत्रकारांसाठी अधिस्विकृती महाराष्ट्र शासनाची मिळावी़ काही अटी आणि नियमांच्या अडचणींमुळे अधिस्विकृती सर्वसामान्य पत्रकारांना मिळत नाही़ त्या संदर्भात शासन स्तरावर नियम शिथील करण्यात यावेत़ मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे़ या चौपदरीकरणानंतर ओरोसगाव येथील टोल नाक्यावर टोल आकाराणी होईल़ त्या टोल आकारणीतून पत्रकार व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना वगळण्यात यावे़ कणकवली तालुक्यातील पत्रकारांसाठी किंवा अन्य जिल्ह्यातून कार्यक्रमासाठी येणाºया पत्रकारांना शासकीय विश्रामगृह येथे एक सुट आरक्षीत करून ठेवण्यात यावा़ तसेच त्या सुटमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी़ ज्या प्रमाणे आपण रत्नागिरीतील पत्रकारांसाठी शासकीय विश्रामगृहावर करून दिली आहे़ त्याच धर्तीवर तालुक्यातील पत्रकारांची गैरसोय दुर करावी या प्रमुख मागण्या कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे़.कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पालकमंत्री ना़ उदय सामंत यांचा सत्कार करताना अध्यक्ष भगवान लोके़ सोबत सुधिर राणे, अजित सावंत, लक्ष्मीकांत भावे, चंद्रशेखर तांबट, महेश सावंत, महेश सरनाईक, दिगंबर वालावलकर, दिलीप हिंदळेकर, तुषार सावंत, तुळशिदास कुडतरकर, भास्कर रासम, शशिकांत सातवसे, पप्पू निमणकर, अनिकेत उचले, विकास गांवकर, नाना लाड, साईनाथ गांवकर आदी.२)कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पालकमंत्री ना़ उदय सामंत यांना निवेदन देताना अध्यक्ष भगवान लोके़ सोबत सुधिर राणे, अजित सावंत, लक्ष्मीकांत भावे, चंद्रशेखर तांबट, महेश सावंत, महेश सरनाईक, दिगंबर वालावलकर, दिलीप हिंदळेकर, तुषार सावंत, तुळशिदास कुडतरकर, भास्कर रासम, शशिकांत सातवसे, पप्पू निमणकर, अनिकेत उचले, विकास गांवकर, नाना लाड, साईनाथ गांवकर आदी.(छाया : अनिकेत उचले)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments