कणकवलीत भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवास प्रारंभ

128
2

कणकवली, ता.१२ : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११६ व्या जन्मोत्सव सोहळ्याला आज रविवारपासून भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. जन्मोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बाबांच्या उत्सवाने कणकवली शहर भालचंद्रमय झाले आहे.
पहाटे समाधीपूजन,काकड आरतीपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तांच्या गर्दीने फुलून गेले.तद्नंतर परमहंस भालचंद्र दत्तयाग या धार्मिक विधीस राजू महेंद्रकर ,सौ. महेंद्रकर या दाम्पत्यांनी तसेच ब्रम्हवृंद व संस्थांनच्या अध्यक्षसुरेश कामत,सदस्य,भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. श्री.सत्यनारायण महापूजा,तद्नंतर आरती व दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.दुपारपासून ४ वाजेपर्यंत विविध सुश्राव्य भजने झाली. त्यानंतर सायंकाळी शाळा कणकवली नं.च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
बाबांच्या या उत्सवानिमित्त समाधीस्थळ फुलांनी तर परिसरात मंडप,विद्युतरोषणाईनी सजवण्यात आले आहे.तसेच वाळूशिल्पानी बाबांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
आणखी पुढील तीन दिवस हा विधी तसेच विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.जन्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मुख्यदिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भक्तगण दाखल होत असतात. रात्री आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.याजन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन भालचंद्र संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

4