पालकमंत्री उदय सामंत ; सिंधु महोत्सव मालवणात होणार…
मालवण, ता. १२ : एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीबाबत आमदार वैभव नाईक व माझी सुरवातीपासूनच विरोधाची भूमिका आहे. काहीजण गैरसमज पसरवित आहे. मात्र आपला एलईडी मासेमारीला विरोध कायम असून यापुढेही तो राहील असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे स्पष्ट केले.
मालवण दौर्यावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांचे तालुका शिवसेनेच्यावतीने फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, जान्हवी सावंत, भाई गोवेकर, संजय पडते, सुरेश पाटील, साईनाथ चव्हाण, बाळू अंधारी, बबन शिंदे, हरी खोबरेकर, मंदार केणी, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, देवयानी मसुरकर, सेजल परब, अंजना सामंत, शीला गिरकर, पंकज सादये, दीपा शिंदे, दर्शना कासवकर, पूनम चव्हाण, रश्मी परुळेकर, नीलम शिंदे, प्रियांका रेवंडकर, बाबा सावंत, श्रीकृष्ण तळवडेकर, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, पर्यटनात दोन मोठे महोत्सव होतात. यातील एक सिंधु महोत्सव तर दुसरा रत्नागिरीतील रत्न महोत्सव. यातील सिंधु महोत्सव येथील किनारपट्टीवर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून होईल. वैभव नाईक यांची लोकप्रियता सिंधुदुर्गताच नव्हे तर राज्यातही आहे. त्यांच्या मतदारसंघात पालकमंत्री म्हणून काम करताना एक टक्काही अन्याय होऊ देणार नाही. जिल्ह्यातील तीन मतदारसंघापैकी सर्वात झुकते माप कुडाळ-मालवणला दिले जाईल. आमदार नाईक सांगतील त्या कामांना प्राधान्य राहील. मी पालकमंत्री असलो तरी या मतदारसंघातील पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार वैभव नाईक यांना राहतील, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार नाईक यांचे कौतुक केले.