कॅथॉलिक पतसंस्थेच्या “धनसमृद्धी ठेव” योजनेला उत्तम प्रतिसाद…

150
2

सावंतवाडी ता.१३: येथील कॅथॉलिक पतसंस्थेच्या माध्यमातून नववर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या धन समृद्धी ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.अवघ्या पहिल्या पाच दिवसात ७६ ठेवीदारांनी १ कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक या योजनेद्वारे केली आहे.५५० दिवस मुदतीच्या या ठेवीवर संस्थेने सर्वसामान्यांसाठी १०% तर ज्येष्ठ नागरिक,महिला व अपंगांकरिता १०.५० टक्के इतका व्याज दर देऊ केला आहे.त्यामुळे संस्थेकडे सध्या मोठ्या प्रमाणात ठेवी जमा होत आहेत.

कॅथॉलिक पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास जपला असून आर्थिक शिस्त,अचूक वक्तशीर सेवा देण्यासाठी केलेली व्यवस्था,आस्थेवाईक पद्धतीने दिलेली ग्राहक सेवा, नवतंत्रज्ञानाचा योग्य वापर,या सर्वामुळे ठेवीदार कॅथॉलिक पतसंस्थेत ठेवींची गुंतवणूक करतात.पहिल्या पाच दिवसात ७६ ठेवीदारांनी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.संस्थेच्या प्रधान कार्यालयासह सर्व शाखांमध्ये ठेवीदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.तरी सदर योजना मर्यादित कालावधीसाठी असून आकर्षक व्याजदरांचा लाभ घेण्यासाठी पतसंस्थेत अधिक मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांनी वेळेत गुंतवणूक करावी,असे आवाहन अध्यक्ष पी.एफ. डॉन्टस यांनी केले आहे.

4