रस्ता अपघात व जनजागृतीसाठी राज्यात “सिंधुदुर्ग पॅटर्न”…

2

उदय सामंत; सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी,ही अभिनंदनीय बाब…

ओरोस ता.१३: सिंधुदुर्ग जिल्हा रस्ते अपघातात व या अपघातातून मृत्यु प्रमाणात राज्यात सर्वात खालच्या पातळीवर आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. त्यामुळे मी माझ्या उच्य शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात रस्ते अपघात प्रमाण कमी करण्यासाठी उपक्रम राबविणार आहे. त्याला ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ नाव देणार आहे, असे प्रतिपादन जिल्हयाचे नूतन पालकमंत्री उदय सामंत यांनी ’31 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह’ या पहिल्याच शासकीय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना केले.
केंद्र शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक व महामार्ग पोलिस या विभागांच्या कार्यालयाच्यावतीने सुरु झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी उपप्रादेशिक कार्यालय पटांगण येथे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी खा विनायक राऊत होते. यावेळी आ. दीपक केसरकर, आ वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, अरुण दुधवडकर, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, नागेंद्र परब यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील आदिवाशी नागरिकांना हेल्मेटचे वाटप पालकमंत्री सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी हे हेल्मेट मोफत उपलब्ध करून दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘सारथी’ या मोटार वाहन कायदेविषयक सर्व माहिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना खा राऊत यांनी, जगात रस्ते अपघातात भारत देश आघाडीवर आहे. देशात महाराष्ट्राचे प्रमाण जास्त आहे. पण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रमाण सर्वात कमी आहे. तरुण मुलांत मोबाइल कानाला लावून वाहने चालविण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे अपघात वाढत आहेत. मात्र, आम्ही देशाच्या संसदेत मोबाईलवर बोलत वाहन चालवीणाऱ्या व्यक्तींचे लायसन रद्द व्हावे. त्यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल व्हावा, असा नवीन कायदा आणत आहोत. जिल्ह्यात सुरु असलेल्या महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. लांजा ते झाराप पर्यंत रस्ता डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होवून तो वाहतुकीस खुला केला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्याचा शुभारंभ होईल, असे यावेळी ते म्हणाले.

4