सावंतवाडीत भाजपाचे आता….,तीन तालुकाध्यक्ष…

191
2

उद्या निवड प्रकीया; कोणाला संधी मिळणार याबाबत कमालीची गुप्तता…

सावंतवाडी ता.१३: येथील भाजपाच्या माध्यमातून उद्या तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.यात विशेष करून पहिल्यांदा एका तालुक्यात तीन तालुकाध्यक्ष नेमण्यात येणार आहेत.आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक होणार आहे.त्यासाठी सावंतवाडी शहर,ग्रामीण व बांदा शहर असे तीन भाग करण्यात आले आहेत.याबाबतची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
उद्या सकाळी साडेदहा वाजता जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत येथील पर्णकुटी विश्रामगृहावर ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.यात नेमके कोण चेहरे तालुकाध्यक्ष म्हणून दिले जाणार आहेत,याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.आपल्याला काहीच माहित नाही,असे येथील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान सद्यस्थितीत विद्यमान तालुकाध्यक्ष महेश सारंग यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.तर बांदा शहरासाठी जिल्हा बॅकेचे संचालक प्रमोद कामत यांचे नाव चर्चेत आहे.

4