बांदा लोकोत्सव नियोजनासंदर्भात १४ रोजी बैठक

101
2

बांदा ता.१३:
बांदा शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेला ‘बांदा लोकोत्सव’ यावर्षी भव्य स्वरूपात साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक १४ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील प्रत्येक ‘लोकोत्सव’ हा गावातील लोकांच्या उत्साहपूर्ण सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला होता.
यावर्षीही दिमाखदार सोहळा साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

4