सांगुळवाडी पूर्ण प्राथमिक शाळेत “माईंड ट्रेनर” सदाशिव पांचाळ यांचे मार्गदर्शन…

85
2

वैभववाडी ता.१३: पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ व मराठी पत्रकार संघ मुंबई चे कोषाध्यक्ष जगदीश भोवड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी मी यशस्वी होणारच… या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला सुप्रसिद्ध माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ हे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रयत्नांना यशात रूपांतरित करण्यासाठी कष्ट, मेहनतीबरोबर माईंड पॉवर अर्थात मनाच्या शक्तीची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ही कार्यशाळा आहे. विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यशाळेचा सांगुळवाडी व परिसरातील सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक व युवावर्गाने लाभ घ्यावा. असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले आहे.

4