शिक्षण समितीच्या सभेत ठराव;इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळा खास नियुक्ती….
ओरोस ता.१३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सेमी इंग्रजीचे शिक्षण जिपच्या प्राथमिक शाळांमधुन मिळावे यासाठी सेमी इंग्रजी शिकविण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्यात येणार आहे. या शिक्षकांना सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांवर ख़ास नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी करणारा ठाराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.
जिप शिक्षण समितीची मासिक सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती डॉ. अनीषा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रभारी सचिव नीलिमा नाईक, सदस्य विष्णुदास कुबल, सुनील म्हापनकर, गट शिक्षणाधिकारी आदि उपस्थित होते.
जिप शाळांमधील मुलांना सेमी इंग्रजीतून शिक्षणाची सवय व्हावी आणि जिप शाळांमधील पट संख्या वाढावी यासाठी काही वर्षापूर्वी जिपच्या शाळांमधुन सेमी इंग्रजी शिक्षण सुरु करण्यात आले होते. मात्र सेमी इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांची बदली झाल्याने काही शाळांनी सेमी इंग्रजी मधून माघार घेतली. मात्र आजच्या सभेत या विषयावर चर्चा झाली असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सेमी इंग्रजीचे शिक्षण जिपच्या प्राथमिक शाळांमधुन मिळावे यासाठी सेमी इंग्रजी शिकविण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्यात येणार आहे. या शिक्षकांना सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांवर ख़ास नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी करणारा ठाराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला. हा ठाराव शासनाला सादर करण्यात येणार आहे.
शालेय वर्षात खेळताना विद्यार्थ्यांना अपघात घडल्यास त्यांना औषधोपचारासाठी काही मदत देता यावी यासाठी 3 लाख रूपये निधी तरतूदीचा स्वतंत्र हेड तयार करण्यास शिक्षण समितीची मान्यता देण्यात आली. जिप सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाल्या नंतर सन 2020-21 पासून ही योजना लागू केली जाणार आहे.