वेंगुर्ले कलावलय संस्थेकडून आयोजन…
वेंगुर्ला : ता.१३ येथील कलावलय संस्थेने घेतलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत समांतर संस्था, सांगली यांची ‘शेवट तितका गंभीर नाही‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला.मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन या एकांकिकेला गौरविण्यात आले.येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय १० ते १२ जानेवारी या कालावधीत कलावलय वेंगुर्ला तर्फे प्रा.स्व.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले होते.
या स्पर्धेत राजारामबापू इन्स्टिट्युट-इस्लामपूरची ‘एक्सपायरी डेट‘ द्वितीय, रसिक रंगभूमी-रत्नागिरीची ‘चोली के पिछे क्या है?‘ तृतीय तर कलांकुर-मालवण ची ‘निर्वासित‘ने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. वैयक्तिक बक्षिसं मध्ये पुरुष अभिनय-प्रथम -ऋषिकेश जाधव (एक्सपायरी डेट), द्वितीय-मयुरी पाटील (शेवट तितका गंभीर नाही), तृतीय-तेजस मसके (दहन अख्यान), स्त्री अभिनय-निवेदिता मणचेकर (चोली के पिछे क्या है), द्वितीय-अक्षता शिदे (ट्रॅफिक), तृतीय-प्रणाली पाटील (एक्सपायरी डेट), दिग्दर्शन-प्रथम-इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही), द्वितीय-ऋषिकेश जाधव (एक्सपायरी डेट), तृतीय-शेखर मुळ्ये (चोली के पिछे क्या है), प्रकाश योजना-प्रथम-विक्रांत जावडेकर (शेवट तितका गंभीर नाही), द्वितीय- प्रतिक पाटील (एक्सपायरी डेट), तृतीय-अंकुश कुलकर्णी (विलग), संगीत – प्रथम – हर्षवर्धन जोशी (दहन आख्यान), द्वितीय-शौनक बेडेकर (कम्फर्ट झोन), तृतीय-अनुपम दाभाडे (विलग), नेपथ्य-प्रथम-इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही), द्वितीय-देवेंद्र कोळंबकर (निर्वासित), तृतीय-वैष्णवी जाधव व शुभम आवळे (एक्सपायरी डेट) यांना देण्यात आला. विजेत्यांना परीक्षक अमरजित आमले, प्रताप सोनाळे, कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, संजय पुनाळेकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.