पक्षाच्या वरिष्ठ पदाधिका-यांचा दुजोरा ;उद्या भरणार उमेदवारी अर्ज…
कणकवली ता.१३: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राजन तेली भाजपाच्या माध्यमातून विधानपरिषदेवर आपले नशीब आजमावत आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी त्यांना संधी देण्यात येणार आहे.उद्या श्री.तेली हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.याबाबत एका भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्या कडून दुजोरा देण्यात आला आहे.
श्री.तेली यांनी यापूर्वी विधानपरिषद आमदार म्हणून यशस्वी कारकीर्द केली होती.नारायण राणे यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे त्यांना मोठा सन्मान होता सद्यस्थितीत ते पुन्हा एकदा राणेंसोबत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांनी तब्बल दोन वेळा आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्यांना याठिकाणी यश आले नाही.परंतु आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर श्री.तेली यांना यश मिळते का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.