जिल्हा वार्षिक योजनेतून ३२ लाखाचा निधी मंजूर…
: कोळंब ते सर्जेकोट- मिर्याबांदा रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ कोळंब सरपंच प्रतिमा भोजने आणि सर्जेकोट- मिर्याबांदा सरपंच नीलिमा परुळेकर यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आला. या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी कोळंब उपसरपंच समीरा बांदेकर, सर्जेकोट उपसरपंच सुनील खवणेकर, माजी सभापती अनिल न्हिवेकर, गोपीनाथ तांडेल, दादा सावजी, संदीप भोजने, विनायक आरोलकर, स्वप्नाली सावजी, मेघना चव्हाण, प्रसाद पाटील, सुनिल लाड, दाजी कोळंबकर, गणेश आचरेकर, राजन आचरेकर, विजय ढोलम, सुनील मलये, नितीन परुळेकर, मायबा गुरुजी, सुनील बांदेकर, स्वप्नील शिर्सेकर, सदा सारंग, शरद लोके, प्रियाल लोके, संदीप शेलटकर, बाबू प्रभुगावकर, निलेश बांदेकर, तुकाराम बांदेकर, संतोष शेलटकर, मोहन सावंत, हेमंत सावजी, उत्तम भोजने, सचिन नरे, भाऊ फणसेकर, जगदीश कांदळकर, आबा कोयंडे, गणेश सारंग, जगन्नाथ सावजी, भाई परब, गणपत सारंग यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.