वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्षपदी सुहास गवंडळकर निवड…

162
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता.१३: 
वेंगुर्ले नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक व गटनेते सुहास गवंडळकर यांची वेंगुर्ले तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यावर मनोगत व्यक्त करताना श्री. गवंडळकर म्हणाले की, पक्षाने जी जबादारी माझ्यावर सोपविली आहे. ती जबादारी सर्वाना बरोबर घेऊन पार पाडीन. तसेच तालुक्यात शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ले शहरात नगरसेवक म्हणून सुहास गवंडळकर यांनी चागले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. आज पक्ष निरीक्षक मंदार कल्याणकर यांच्या उपस्थितीत श्री. गवंडळकर यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी श्री. कल्याणकर यांच्यासह मावळते तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी श्री. गवंडळकर यांचे अभिनंदन केले. मावळते तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी प्रामाणिकपणे काम करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी गवंडळकर यांचे सलोख्याचे संबंध असल्याने ते सुद्धा तालुक्यात सर्वांना बरोबर घेऊन पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करतील असे श्री. कल्याणकर यांनी सांगितले. तर मावळते तालुकाध्यक्ष बाळू देसाई म्हणाले की, मला तालुक्यतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या पुढेही पक्ष वाढीसाठी श्री. गवंडळकर यांना माझे सहकार्य राहणार असेल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. यामध्ये माजी उपसभापती स्मिता दामले, जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, नगरसेवक शीतल आंगचेकर, धर्मराज कांबळी, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, सुषमा प्रभुखानोलकर, बाबा राऊत, सरपंच शंकर घारे, मनोज उगवेकर तसेच प्रशांत खानोलकर, बाळू प्रभू, संतोष परब, सुजाता देसाई, रीमा मेस्त्री, इनरव्हीलच्या अध्यक्ष वृंदा गवंडळकर, गिरगोल फर्नांडिस, प्रकाश धावडे, रमेश नार्वेकर, लक्ष्मीकांत कर्पे, शेगले गुरुजी, जगन्नाथ राणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.