Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही...

सिंधुदुर्गच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही…

उदय सामंत; वेंगुर्ले कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला विश्वास..

वेंगुर्ले ता.१३: मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राबवलेली विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहीन.खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांचे मार्गदर्शन घेऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबरोबरच वेंगुर्ला – सावंतवाडी – दोडामार्ग मतदारसंघातील विकासकामे मंजूर करण्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा नूतन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दिली.
यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख यशवंत परब, सभापती अनुश्री कांबळी, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, म्हाडा पदाधिकारी सचिन वालावलकर, माजी सभापती सुनिल मोरजकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, प्रदीप गोडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, जि. प.सदस्य सुनिल म्हापणकर, पं. स.सदस्य प्रणाली बंगे, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम तसेच सुनीलडुबळे, अजित सावंत, सचिन देसाई, अजित राऊळ, सुकन्या नरसुले, पंकज शिरसाट, विवेक आरोलकर, रमण वायगणकर, विवेक कुबल, प्रकाश गडेकर, माजी उपसभापती स्वप्नील चमणकर, गंगाधर गोवेकर, सुरेश भोसले, राजन गावडे, मंजुषा आरोलकर, हेमंत मलबारी, उमेश येरम आदींसह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत यांचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद , पंचायत समिती मतदारसंघ, तालुक्यातील प्रमुख मान्यवर तसेच वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ यांच्यावतीनेही त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार माजी सभापती व उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments