आता टार्गेट सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे…

2
  1. उदय सामंत; नियोजनच्या माध्यमातून झालेल्या कामाचे क्रेडीट विरोधकांना घेऊ देणार नाही

सावंतवाडी ता.१३: आता टार्गेट सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे,२०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत येथील जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला पाहीजे,त्यासाठी
कामाला लागा,असे आवाहन नवनिर्वाचित पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.नियोजन मंडळाच्या माध्यमातून झालेल्या कामाचे श्रेय विरोधकांना घेवू देणार नाही,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तत्कालीन नगराध्यक्ष व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलला.त्यामुळे आता काही राजकीय बदल झाले तरी वाईट वाटून घेण्याची गरज नाही.कोण करू शकतो हे लोकांना माहीत आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात श्री.सामंत यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत,माजी पालकमंत्री दीपक केसरकर,अरुण दुधवडकर,संजय पडते,मायकल डिसोझा,रुपेश राऊळ,संजना सावंत, शैलेश परब, राजू नाईक,अण्णा केसरकर,अपर्णा कोठावळे,प्रशांत कोठावळे,नीता कविटकर,गुणाजी गावडे,अमेय तेंडोलकर, प्रतीक बांदेकर,सुरेंद्र बांदेकर
आदी उपस्थित होते.

4