Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedमनसेच्या जनहित राज्य उपाध्यक्षपदी राकेश पेडणेकरांची नियुक्ती...

मनसेच्या जनहित राज्य उपाध्यक्षपदी राकेश पेडणेकरांची नियुक्ती…

मुंबई ता.१३:  मनसेच्या जनहीत कक्ष व विधी विभाग राज्य उपाध्यक्षपदी ठाणे येथील राकेश पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.याबाबतची घोषणा विधी विभागाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली.दरम्यान या निवडीबद्दल मनसेचे नेते बाळा नांदगावकर व रिता गुप्ता यांनी नियुक्तीपत्र देऊन श्री.पेडणेकर यांचे अभिनंदन केले.
ठाणे येथे राहणारे पेडणेकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा येथील आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments