बँक कर्मचाऱ्यांने घातला कोट्यावधींचा घोटाळा…

509
2

वैभववाडीतील एका को-अॉपरेटिव्ह मल्टीटेस्ट बँकेतील धक्कादायक घटना…

वैभववाडी.ता,१३:

तालुक्यातील एका नामांकित असलेल्या को-अॉपरेटीव्ह मल्टीस्टेट बँकेतील एका कर्मचाऱ्यांने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा जोरदार सुरू असून ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत पोलिसात कोणीही तक्रार दिलेली नाही.
तालुक्यात गेली दहा बारा वर्षे कार्यरत असलेल्या या बॕंकेत तालुक्यातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात बॕंक खाती आहेत. बॕंंकेतील एका कर्मचाऱ्यांने आपल्या ओळखीच्या व विश्वासातील व्यक्तींच्या मुदत ठेवी व बचत खात्यातील रक्कम खोट्या सह्या तर काहींना गरज असल्याचे सांगून परस्पर हडप केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ही बातमी ग्राहाकांना समजताच त्यांनी बॕंकेत धाव घेऊन बॕंक प्रशासनाला याबाबत जाब विचारला व आपल्या पैशाची मागणी केली. याबाबत माहीती मिळताच बॕंकेच्या प्रशासनाने बॕंकेत येऊन ठेवीदारांना शांत करुन तीन दिवस थांबण्याची विनंती केली आहे. याप्रकरामुळे तालुक्यातील ठेवीदार धास्तवले असून एकच खळबळ उडाली आहे.
मात्र उशीरापर्यंत याबाबत पोलिसात कोणीही तक्रार दिलेली नाही. बॕंक प्रशासन याबाबत आता नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

4