महात्मा जीवनदायी योजनेचा पत्रकारांना लाभ द्या…

155
2

सावंतवाडी पत्रकार संघाची,पालकमंत्री सामंत यांच्याकडे मागणी…

सावंतवाडी ता.१३: पत्रकारांना महात्मा जीवनदायी योजनेचा फायदा देण्यात यावा,तसेच पत्रकारांना घरे बांधण्यासाठी सरकारी भूखंड उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी आज येथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.याबाबतचे निवेदन आज श्री.सामंत यांना देण्यात आले.
यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई ,सचिव तथा जिल्हा सोशल मिडीयाचे समन्वयक अमोल टेंबकर ,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्‍चंद्र पवार,शुभम धुरी आदी उपस्थित होते.

4