चोरीस गेलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी केले मुळ मालकाला परत…

169
2

वैभववाडी ता.१४: येथील पोलासांनी चोरट्याकडून हस्तगत केलेले ७६ ग्रॕम वजनाचे सुमारे ३ लाख २४ हजाराचे सोन्याचे दागीने न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी दोन फिर्यादीना परत केले.
दि.१६ एप्रिल २०१९ रोजी कोकिसरे बांधवाडी येथील आनंदीबाई दत्ताराम नारकर यांच्या घरात घुसून चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने चोरुन नेले होते.तर लोरे येथे दिनांक १७ मे २०१९.रोजी सौजन्या धाकोजी सुतार यांच्या गळ्यातील मंगळसूञ अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले होते.
याबाबत संबंधितांनी वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्ताञय बाकारे यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी उत्तम राजाराम बारड वय २७ रा.धामोड ता.राधानगरी, जि.कोल्हापूर यास अटक करुन म्हापसा गोवा येथून गुन्ह्यातील दागीने हस्तगत करण्यात आलेले होते.सदरचे दागीने हे सोमवारी न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीना परत करण्यात आले.
वैभववाडी पोलिसांनी याप्रकरणी जलद कारवाई करीत आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत केला.फिर्यादीने याबाबत समाधान व्यक्त करीत पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.

4