भाजपाच्या ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संदीप गावडे यांची निवड…

2

शहराची जबाबदारी सिध्दार्थ भांबूरेंकडे,तर बांद्याची निवड पुढे ढकलली…

सावंतवाडी ता.१४: येथील भाजपा तालुकाध्यक्षपदावर अखेर दोघांना संधी देण्यात आली.तर एक निवड पुढे ढकलण्यात आली.यात सावंतवाडी शहराची जबाबदारी अॅड.सिध्दार्थ भांबूरे तर ग्रामीण भागाची जबाबदारी संदीप गावडे यांच्याकडे देण्यात आली.
बांदा तालुकाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली.या प्रकीयेत स्थापन करण्यात आलेल्या तीन पदांना मंडल,असे नाव देण्यात आले आहे.ही प्रकीया निवडणूक निरिक्षक भाऊ सामंत आणी विलास हडकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी पुखराज पुरोहित,महेश सारंग,नगराध्यक्ष संजू परब
दादू कविटकर,निशू तोरसकर,आनंद नेवगी, मनोज नाईक,परिमल नाईक,प्रसाद अरविंदेकर,सुधीर आडीवरेकर,परिणीता वर्तक,धनश्री गावकर,अब्दुल साठी,विद्या परब,अजय सावंत,प्राजक्ता केळसकर आदी उपस्थित होते.

13

4