माणगाव-निळेली येथील युवतीची गळफास लावून आत्महत्या…

2705
2

माणगाव ता.१४: निळेली येथील एका २६ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सायली वासुदेव धुरी (रा.पशुपैदास वसाहत),असे तिचे नाव आहे.ही घटना काल रात्री उशिरा दिड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.दरम्यान तिने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सायली हिच्यावर सन २०१७ पासून मानसोपचार सुरू होते.मात्र काल रात्री तिने राहत्या खोलीच्या मागच्या पडवीत गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच माणगाव सहाय्यक पोलीस देवानंद माने,पोलीस नाईक सचिन सोंसुरकर,पोलीस कॉन्स्टेबल अजय फोंडेकर घटनास्थळी दाखल झाले.तर सदर घटनेचा पंचनामा महिला पोलीस शीतल पाटील यांनी केली. मयत सायली धुरी हिच्या पश्चात आई,वडील व भाऊ असा परिवार आहे.

4