सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सभापती निवडीत नारायण राणेंचे धक्कातंत्र…

108
2
Google search engine
Google search engine

शारदा कांबळे,सावी लोके,रविंद्र जठार,माधुरी बांदेकर यांना दिली संधी…

सिंधुदुर्गनगरी ता 14
जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती निवडीसाठी भाजप नेते खा नारायण राणे यांनी धक्कातंत्राचा वापर केला आहे. शारदा कांबळे यांची समाज कल्याण सभापती पदासाठी उमेदवारी जाहिर केली असून महिला व बाल कल्याण, वित्त व बांधकाम, शिक्षण व आरोग्य या तीन पदांसाठी सावी लोके, रविंद्र उर्फ बाळा जठार, माधुरी बांदेकर यांची उमेदवारी जाहिर केली आहे. खा राणे यांच्या या धक्कातंत्रामुळे सभापती पदासाठी चर्चेत असलेले उत्तम पांढरे, उन्नती धुरी, महेंद्र चव्हाण व विद्यमान सभापती अंकुश जाधव, डॉ अनिशा दळवी यांचे पत्ते कट झाले आहेत. थोड्याच वेळात हे चारही उमेदवार आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी कॉंग्रेस-शिवसेनेने अर्ज दाखल केले होते. मात्र, विषय सभापती निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.