बांदा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा चतुर्थ वर्धापन दिन १६ रोजी…

2

बांदा ता.१४:
येथील जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या चतुर्थ वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक १६ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला बांदा जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, इन्सुलि जिल्हा परिषद सदस्य उन्नती धुरी, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी, वाफोलि सरपंच अक्षता आरोन्देकर, डेगवे सरपंच वैदेही देसाई, डिंगणे सरपंच सौ. सावंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. श्रीपाद जोशी हे ज्येष्ठांचे आरोग्य व आहार याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर तेली हे सेवानिवृत्त सरकारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक यांना सातव्या वेतन आयोगाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी अक्रम खान, शीतल राऊळ, मानसी धुरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष अन्वर खान, सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

4