बांदा नट वाचनालयात २५ जानेवारी रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन…

2

बांदा.ता,१४: 
येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक २५ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित शालेय स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अंकुश रामचंद्र माजगावकर यांनी कै. परशुराम लाडू नाईक व कै. लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली आहे. पाचवी ते सातवी या गटासाठी ‘रम्य ते बालपण’, ‘स्वच्छ सुंदर माझं गाव’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. ५०० शब्दमर्यादा असून वेळ एक तास आहे.
आठवी ते दहावी या गटासाठी ‘माझा आवडता साहित्यिक- वि. स. खांडेकर’, ‘महाराष्ट्रातील संत परंपरा’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी शब्दमर्यादा ७०० असून वेळ १ तास ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

4