उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाला उज्वला खानविलकर यांच्याकडून दोन लाखाची देणगी…

138
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा.ता,१४: 
मळगावच्या सुकन्या उज्वला यशवंत खानविलकर-पटेकर यांनी येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाला २ लाख रुपये देणगीचा कायम ठेवींचा धनादेश वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, ग्रंथपाल आनंद देवळी, माजी अध्यक्ष रवींद्रनाथ कांबळी आदी उपस्थित होते. या ठेवीच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेत आपली आई कै. यशवंती धोंडू पटेकर यांच्या स्मरणार्थ उपक्रम किंवा वाचन क्षेत्राशी निगडित कार्यक्रम राबवावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी वाचनालयातील महिला कक्ष, बालकक्ष, वाचनकक्ष, अभ्यासिका, समृद्ध ग्रंथसंपदा याबाबत श्रीमती खानविलकर यांनी कौतुक केले. आभार गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले.

\