चांदा ते बांदा योजना सुरू राहण्यासाठी प्रसंगी आंदोलन…

2

महेश सारंग;केसरकरांनी सुद्धा सहभागी व्हावे…

सावंतवाडी ता.१४:  काही झाले तरी चांदा ते बांदा योजना बंद पडू देणार नाही,ही योजना भाजपाने आपल्या या माध्यमातून राबवली होती.ही योजना चालू राहण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची आमची तयारी आहे,त्यामुळे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे केले.भाजपाची तालुकाध्यक्षपद निवड प्रक्रिया आज येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.यावेळी मावळते तालुकाध्यक्ष श्री.सारंग यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले,याप्रसंगी ते बोलत होते.

4