वेंगुर्ले शाळा नं. ४ मध्ये केले साहित्याचे वाटप
वेंगुर्ले : ता.१४
वेंगुर्ले शहरातील इनरव्हील क्लब विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. या इनरव्हिल क्लबने शाळा भेट कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ले शाळा नं. ४ ला भेट देऊन या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांन बरोबर संवाद साधला. तसेच या शाळेतील काही मुलांना बूट, सॉक्स तसेच खेळाचे साहित्य आणि वॉटर फिल्टरही भेट देण्यात आला.
या कार्यक्रमा वेळी इनरव्हिलच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी इनरव्हिल च्या डिस्ट्रिक्ट कॉर्न. नंदा झाडबुके, प्रेसिडेंट वृंदा गवंडळकर, सेक्रेटरी गौरी मराठे, प्रणाली अंधारी, पूजा कर्पे, अंकिता बांदेकर, अक्षया गिरप तसेच शाळेच्या मुख्याध्यापक संध्या बेहरे व शिक्षक उपस्थित होते. या वेळी त्यांनी वेंगुर्ले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर चार ही इनरव्हील स्कूल म्हणून घोषित केली.