साईप्रसाद कल्याणकर; प्रशासनावर भार नको, निवडणूक आयोगाकडे मागणी…
बांदा.ता,१४: आपल्या पदाचा कालावधी पूर्ण न होता अर्ध्यावरती राजीनामा देणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधीच्या मालमत्तेतून पोट निवडणूक खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.याबाबत यांनी प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की निवडणूकीनंतर आपला कालावधी पूर्ण होण्यापूर्वी काही लोकप्रतिनिधींकडून राजीनामे देण्याचा प्रकार आता वाढला आहे.
सावंतवाडी व बांदा या दोन ठिकाणी हा प्रकार झाला आहे. मात्र अर्ध्या वरती राजीनामे देण्यात आल्यामुळे या निवडणुका पुन्हा लागल्या आहेत. परिणामी सर्व यंत्रणा प्रशांत व नागरिक या सर्व प्रक्रियेत भरडले जात आहेत.वारंवार आचारसहिता लागत असल्यामुळे त्याचा फटका विकास कामावर होत आहे.तर पुन्हा यंत्रणा राबवण्यासाठी शासनाला मोठा खर्च करावा लागत आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता जो कोणी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.त्या व्यक्तीचे मालमत्ता शासनाने आपल्याकडे ठेवून त्यावर बोजा ठेवावा व त्या लोकप्रतिनिधीच्या काळात पोटनिवडणुक झाल्यास होणारा खर्च मालमत्तेतून वसूल करावा अन्यथा पाच लाखाचा दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी कल्याणकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.