कुडाळ-राष्ट्रवादी काँग्रेसकडून लेखक जयभगवान गोयल यांचा निषेध…

2

“आजका शिवाजी नरेंद्र मोदी ” पुस्तक प्रकाशित करून महाराजांचा अपमान केल्याचा आरोप…

कुडाळ ता.१४: छञपती शिवाजी महाराजांना अपमानित करणारे “आजका शिवाजी नरेंद्र मोदी ” हे पुस्तक प्रकाशित करून महाराजांचा अपमान करणाऱ्या लेखक जयभगवान गोयल यांचा आज येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.दरम्यान गोयल यांच्या निषेधार्थ येथील मुंबई-गोवा मार्गावर आर.एस.एन हॉटेल जवळ त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन हा निषेध व्यक्त करण्यात आला.जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर,तालुकाध्यक्ष भास्कर परब,सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस चंद्रकांत पाताडे,विधान सभा अध्यक्ष सावळाराम अणावकर,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक,अल्प संख्याक सेल तालुकाअध्यक्ष नझीर शेख,महिला तालुका अध्यक्षा पूजा पेडणेकर,डाॅ अभिनंदन मालणकर,तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर,तालुका सरचिटणीस प्रसाद पोईपकर,जिल्हा बॅक संचालक आत्माराम ओटवणेकर,शहरअध्यक्ष संग्राम सावंत,बाबी सावंत,विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,अशोक सावंत,अशोक कांदे,कृष्णा बिबवणेकर,आनंद पाटकर,विनायक हादगे,योगेश ज्ञानदेव माळकर.नरेश वरक.दत्ताञय कदम.बाळा सातार्डेकर.महेश कदम.अनिल कानडे.आदी उपस्थित होते.

0

4