तिथवलीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

2

तिथवलीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

वैभववाडी, ता. १४ : तिथवली तावडेवाडी येथील परशुराम पांडुरंग हरयाण (वय- ४६) वर्षे या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना मंगळवारी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत परशुराम पांडुरंग हरयाण हा मुंबई येथे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. १० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता घरातून कामावर जातो असे पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. मात्र गेल्या चार ते पाच दिवसापासून घरी न परतल्याने घरातील नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही.
मंगळवारी सकाळी मयताचे भाऊ घराच्या परसामध्ये गेले असता आपला भाऊ परशुराम याने झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेला आढळून आला. याबाबत घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास भुईबावडा दूरक्षेत्राचे पोलीस एस. बी. वसावे, श्री. वानोळे करीत आहेत.

6

4