कणकवली तालुक्यातून अल्पवयीन युवती बेपत्ता…

2

 

अपहरण झाल्याची वडिलांची फिर्याद ; टँकर चालकावर संशय…

कणकवली, ता.१४ : कणकवली तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन युवती बेपत्ता झाली आहे. तिचे अपहरण झाल्याची फिर्याद युवतीच्या वडिलांनी आज येथील पोलिसांत दिली. या तक्रारीवरून धरण प्रकल्पावर टँकर चालक असलेल्या सोमा राठोड (रा.नांदेड) याच्यावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.
तालुक्यातील एका प्रकल्पावर कामावर परजिल्ह्यातील कुटुंबे कामाला आली आहेत. या कुटुंबातील एक अल्पवयीन युवती सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली. मात्र तेथे पोचली नसल्याने तेथील मुकादमाने याबाबतची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानंतर गावात शोधाशोध करून ती सापडली नाही. तसेच त्याच गावात एका टँकवर चालक म्हणून काम करणारा सोमा राठोड हा देखील फरार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानेच आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी आज पोलिसांत दिली.

4