अज्ञात वाहनाच्या धडकेत मडूरा महसुल मंडळ अधिकारी जखमी…

115
2

इन्सुली डोबवाडी येथील घटना

बांदा.ता,१४: 
मागाहून येणार्‍या चारचाकी वाहनाने ठोकरल्याने दुचाकी घसरुन पडल्याने मडूरा महसुल मंडळ अधिकारी ए. वाय. पवार गंभीर जखमी झाले. झाराप – पत्रादेवी बायपासवर इन्सुली डोबवाडी येथे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात वाहनाने ठोकरुन तेथून पलायन केले. त्याचवेळी इन्सुलीहून बांद्याच्या दिशेने येणार्‍या निगुडे येथील सामाजिक कार्यकर्ते न्हानू शेगडे यांनी जखमी पवार यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. बांदा पोलीस बांदा आरोग्य केंद्रात दाखल झाले आहेत. पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.

4