प्रसंगी आंदोलनाची तयारी; वैद्यकीय अधीक्षक व नगराध्यक्षांना निवेदन…
सावंतवाडी ता.१५: येथील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेल्या सेवा सुविधा देण्यात याव्यात,अशी मागणी आज येथील महाविद्यालयव विद्यार्थी व युवाईच्या वतीने कुटीर रुग्णालय प्रशासनाकडे व नगराध्यक्षांकडे करण्यात आली.यावेळी केवळ सुविधा नसल्यामुळे चार दिवसापूर्वी माजगाव येथील किरण परीट या अपघातात जखमी झालेल्या युवकाला मदत मिळणे शक्य झाले नाही,असे यावेळी सांगण्यात आले.मुलांच्या जीवनात अनेक यातना आहे.त्यामुळे त्या सोडवण्यासाठी येथील रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा सुधारा,रिक्त पदे भरा,आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्या,अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी महेंद्र पेडणेकर,सचिन घावरे,विनय वाडकर,विनायक गावस,अब्रार शेख,ओंकार शिंगोटे,धीरज लाड,विनायक सावंत,अनिकेत सावंत,केतन सावंत आदी उपस्थित होते.