पुण्यातील पर्यटकांकडून इन्सुलीतील डंपर चालकाला दारूच्या बाटलीने मारहाण

288
2

गोवा- मालपे येथील घटना; चौकशीसाठी गाडीसह आठ जण बांदा पोलिसांच्या ताब्यात

बांदा ता.१५: हुलकावणी दिल्याच्या रागातून पुणे येथील आठ पर्यटकांनी इन्सुली येथील डंपर चालकाला काचेच्या बाटलीने मारहाण केली.यात तो किरकोळ जखमी झाला आहे.हा प्रकार आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास गोवा-मालपे येथे घडला.दरम्यान मारहाण करून पळून जाणाऱ्या पर्यटकांना बांदा तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांची बांदा पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच बांदा,इन्सुली येथील ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे.

4