अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखेचा उपक्रम
वेंगुर्ले : ता.१५
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दी स्काॅलर आॅफ सिंधुदुर्ग अॅवाॅर्ड २०२० अंतर्गत जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन शुक्रवार १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.०० ते ३.०० या वेळेत आठही तालुक्यातील नियोजित परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत सराव परीक्षेत जिल्हयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दी स्कॉलर आॅफ सिंधुदुर्ग अॅवाॅर्ड २०२० हा किताब बहाल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावर टाॅप टेन यादीत येणाऱ्या दहा गुणवत्ता धारकांना आणि प्रत्येक तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तालुका स्काॅलर हा किताब व तालुकास्तरावर टाॅप टेन यादीत येणाऱ्या दहा गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. आधिक माहीतीसाठी संबंधित शाळेतील शिक्षकांशी किंवा जिल्हा परीक्षा प्रमुख पांडूरंग मोर्ये (९४२२३७४०५२)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष के.टी.चव्हाण, सरचिटणीस गुरूदास कुबल यांनी केले आहे.